राज्यातील करोनाबाधितांचे मृत्यू होण्याचं प्रमाणही हळूहळू वाढताना दिसत असून वसईत करोनाचा दुसरा बळी गेला आहे. वसईतील एका ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा रविवारी रात्री मृत्यू झाला.
वसईच्या ओम नगर परिसरात हा रुग्ण रहात होता. हॉटेल ताजमध्ये ते कामाला होते. १२ वर्षांपासून ते किडनीच्या आजारानं त्रस्त होते. त्यांचे डायलिसीस देखील सुरू होते. मागील दोन दिवसांपासून नालासोपारा येथील रिद्धीविनायक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथं तपासणी केली असता त्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. मात्र, रविवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर माणिकपूर पोलिसांनी ओमनगरचा परिसर पूर्णपणे सील केला आहे. महापालिकेने देखील हा परिसर निर्जंतुकीकरण केला आहे.