सुरक्षेच्या साधनांचा तुटवडा
संचारबंदीच्या काळात खासगी डॉक्टरांना दवाखाने सुरू ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्याने अनेक डॉक्टरांनी आपले दवाखाने सुरू केली आहेत. मात्र, मास्क, गाऊन, कॅप, गॉगल आदी सुरक्षेच्या साधनांचा त्यांना तुटवडा भासत आहे. तर रुग्णालयातील डॉक्टरांना कर्मचाऱ्यांची कमतरता भेडसावत आहे. त्यामुळे त्यांच्यातही भी…
वसई-विरारमध्ये आणखी चार रुग्ण
वसई विरार परिसरात शनिवारी करोनाचे चार नवीन रुग्ण आढळले. यातील एक वसई-विरार शहर महापालिका हद्दीतील, तर तिघे वसईच्या ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागात नालासोपारा पश्चिमेस राजोडी परिसरात दोन, तर विरारच्या आगाशी येथे एक रुग्ण आढळला आहे. हे तिघेही २८ ते ३५ वर्षे वयोगटातील आहेत. वसईच्या ग्रामीण भागातही…
रिक्षावाल्यांची ‘अत्यावश्यक’ कर्मचाऱ्यांसाठी मोफत सेवा
करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात संचारबंदी आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि अधिकारी वगळता सर्वांना संचारबंदी लागू आहे. मात्र, अशा अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळेवर पोहोचण्यासाठी नालासोपारा येथील रिक्षावाले पुढे सरसावले असून त्यांना विनामूल्य सेवा देत आहेत. करोनाचा प्रादुर्भाव सध्या…
वसईत करोनाचा दुसरा बळी; ताज हॉटेलच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू
राज्यातील करोनाबाधितांचे मृत्यू होण्याचं प्रमाणही हळूहळू वाढताना दिसत असून वसईत करोनाचा दुसरा बळी गेला आहे. वसईतील एका ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा रविवारी रात्री मृत्यू झाला. वसईच्या ओम नगर परिसरात हा रुग्ण रहात होता. हॉटेल ताजमध्ये ते कामाला होते. १२ वर्षांपासून ते किडनीच्या आजारानं त्रस्त होते. त…
फिरण्यासाठी सुट्टी नाही; घरातच बसा: मुख्यमंत्री ठाकरे
मुंबई महानगर प्रदेशासह नागपूर, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अत्यावश्यक वस्तू आणि सेवा सोडून सर्व गोष्टी बंद ठेवण्यात येणार आहेत. कार्यालयेही बंद ठेवण्यात येत आहेत. ३१ मार्चपर्यंत हा बंद राहणार आहे. त्यामुळे बाहेर फिरायला जाऊ नका. ही फिरण्यासाठीची सुट्टी नाही. हे आपणच आपल्यावर घातलेलं बंधन आहे. त्या…
देशातील रुग्णांची संख्या २२३ वर, परदेशी नागरिक ३२
देशात करोनाचे आतापर्यंत १९५ रुग्ण आढळले आहेत. त्यात ३२ विदेशी नागरिकांचा समावेश आहे. तर करोनामुळे आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक आणि पंजाबमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने ही माहिती दिली आहे. वाचा करोनासंदर्भातील विविध राज्यांमधील अपडेट्…